ऐन थंडीत महिला संतप्त साताऱ्यात पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

पाणीपुरवठ्याचा “कारभारी’ बदलण्याची मागणी

सातारा – सातारा शहराला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही पाणी पुरवठा विभागातील सावळ्या गोंधळामुळे सातारकर नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. गेले तीन चार दिवस समर्थ मंदिर परिसरात पाण्याचा खेळखंडोबा सुरु आहे. पाण्यासाठी ऐन कडाक्‍याच्या थंडीत समर्थ मंदिर चौकात घागरी घेऊन महिलांना रस्ता रोको आंदोलन करावे लागले. महिलांनी समर्थ मंदिर चौकातच आंदोलन केल्याने परळी, कासकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान गेले वर्षभर पाण्याचा खेळखंडोबा सुरु असून पाणी पुरवठा विभागाचा कारभार सुधारण्यासाठी “कारभारी”च बदला अशी मागणी यावेळी महिला वर्गानी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी आंदोलनातील संतप्त महिला म्हणाल्या, गेल्या दोन दिवसांपासून समर्थ मंदिर भागात पाण्याची ओरड सुरू आहे. अनेकदा महिलांनी पाणी येत नाही अशा तक्रारी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात केल्या, तरी त्याकडे दुर्लक्ष केले. या भागात पालिकेचे जबाबदार पदाधिकारी रहातात. त्यांच्याकडेही महिला गेल्या होत्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर हांडे घेऊन उतरावे लागले अशा प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केल्या. गेल्या वर्ष भरात पाणी पुरवठा विभागाचा कारभार चांगला चव्हाट्यावर आला आहे. पाणी पुरवठा विभागाला सक्षम पदाधिकारी आणि अधिकारी नसल्याने वारंवार पाणी पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. खा. उदयनराजे आता तुम्हीच या पाणी पुरवठा विभागाच्या कारभाराकडे लक्ष केंद्रित करावे म्हणजे कारभारात सुधारणा होईल अशा प्रतिक्रिया नागरीकांनी बोलताना व्यक्त केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)