ऐन टंचाईत भागविली गावकऱ्यांची तहान

वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ खातवळच्या प्रभाकर फडतरेंकडून मोफत पाणी पुरवठा

वडूज – गावाला भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी दिवंगत वडीलांच्या स्मरणार्थ संपूर्ण गावाला पदरमोड करून विनामोबदला पाणी देण्याचा निश्‍चय खातवळ, ता. खटाव येथील प्रभाकरशेठ शिवाजी फडतरे यांनी केला आहे. फडतरे यांनी याबाबत तहसिलदार जयश्री आव्हाड, गटविकास अधिकारी रमेश
काळे यांना निवेदन दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक सत्यवान कांबळे,बेंगलोर सिल्व्हर ऍन्ड गोल्डन रिफायनरी असोसिएशनचे अध्यक्ष विलासशेठ फडतरे, मायणी अर्बनचे माजी संचालक शंकरराव फडतरे, ज्येष्ठ नेते देवानंद फडतरे, सुनिल उर्फ नंदुनाना फडतरे, माजी सरपंच अशोक फडतरे, ऍड. गजानन फडतरे, चेअरमन नवनाथ फडतरे,महादेव अहिवळे, आनंदराव फडतरे, तानाजी बागल, हणमंत फडतरे, विजय फडतरे, रामचंद्र मदने, राहूल शिंदे, चंद्रकांत फडतरे, चंद्रकांत कुंभार, नामदेव फडतरे, हणमंत मदने, प्रथमेश महाजन, बाबुराव फडतरे आदीसह ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती.
खटाव तालुक्‍याच्या पूर्व भागांत असणाऱ्या खातवळ गावाला कोणत्याही बारमाही पाणी योजनेतून पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असतात.

यावर्षी देखील गावातील ग्रामस्थांना गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थ रानोमाळ भटकंती करून आपली पाण्याची गरज पूर्ण करीत आहेत. ग्रामस्थांची होणारी पाण्याची ही गैरसोय ओळखून बेंगलोरस्थीत गलाई व्यवसायिक व येथील प्रतिष्ठीत नागरिक प्रभाकरशेठ फडतरे यांनी दिवंगत वडील शिवाजीराव फडतरे (आबा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वत:च्या विहीरीतून ग्रामस्थांना पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला.फडतरे यांची नविन खुदाई केलेली विहीर श्रीराम मळा याठिकाणी आहे. या विहीरीस मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. या विहीरीतून ते गावाला विनामोबदला स्वखर्चाने पाणी पुरवठा करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)