प्रवाशांची गैरसोय
सिंधुदुर्ग – ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचे मार्गावरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. रेल्वे गाड्या तब्बल 5 तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मुहुर्त लांबणार आहे. गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ट्रेन बंचिंगमुळे वेळापत्रक कोलमडल्याचे सांगण्यात येत आहे.

गणेशोत्सवासाठी ट्रेनने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जादा गाडया सोडण्यात आल्या आहेत. रडतखडत सुरु असलेल्या या प्रवासामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोकण रेल्वेच्या या नियोजनशून्य कारभारावर अनेक प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रेल्वेने जादा गाड्या सोडल्या पण वेळापत्रकाच्या नियोजनाचे काय ? असा सवाल प्रवाशांनी विचारला आहे. रात्री निघालेल्या अनेक ट्रेन अजूनही कोकणात पोहोचलेल्या नाहीत. अप मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी, नेत्रावती, तेजस, सावंतवाडी गणपती विशेष अशा अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)