ऐन काढणीतच सोयाबीन दरात घसरण

व्यापाऱ्यांकडून अडवणूक : अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष

रहिमतपूर, दि. 6 (प्रतिनिधी) – कमी कालावधीत हमखास पैसे मिळून देणाऱ्या सोयाबीनचे रहिमतपूर परिसरात चांगले उत्पादन होते. परंतु, सोयाबीनची काढणी ज्या वेगात सुरु आहे त्याच वेगात दरातील घसरण सुरू झाली आहे. तीन हजार चारशे रुपयांवर असणारा दर व्यापाऱ्यांनी दोन हजार सातशे रुपयांवर आणून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
रहिमतपूर परिसरात उसाबरोबर सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघते. नव्वद दिवसात तयार होणारे पिक असल्याने जास्तीत जास्त शेतकरी पेरणी करतात. परंतु, जसजशे पिक तयार होऊन काढणी मळणी करुन बाजारात येईल तसतसे दरात घसरण सुरू झाली आहे. दररोज शंभर रूपयांनी दर कमीच होत आहे. गेल्या आठ दिवसात परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेकांची हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात कुजून जाण्याची भीती व्यक्त होती. पावसाची उघडीप मिळाली की शेतकरी सोयाबीन काढणी मळणी करून घेत आहेत. परंतु, पावसाचे संकट थांबले की कमी दराचे दुसरे संकट उभे राहिले आहे. त्याबरोबर फॅट लावण्याचे प्रमाण आहेच. दहा फॅट लागल्यास प्रति क्विंटल 10 किलो कपात, माती 1 किलो कपात असे करून दर दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचत आहे. तसेच हा दर अजूनही कमी होणार याची भिती दाखवीत आहेत. फॅट मशिनमध्ये ही तफावत आहे. एकाच पोत्यातील सोयाबीनची फॅट प्रत्येक व्यापाऱ्याकडे वेगळी लागत आहे.
आर्थिक अडचण, सोयाबीन साठवणूकीची अडचण, दर कमी मिळेल याची भीती आणि ठेवले तरी दिवाळीनंतच दर मिळेल म्हणून मिळेल त्या भावात शेतकरी सोयाबीन घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी बरोबर व्यापाऱ्यांचे सुल्तानी संकट कोसळले आहे.

-Ads-

शासकीय खरेदी केंद्रे उघडणार कधी?
शासनाने सोयाबिनसाठी 3400 हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, अजून एक ही खरेदी केंद्र सुरू नाही. शासनाने हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. परंतु, आजपर्यंत जिल्ह्यात कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. व्यापाऱ्यांपर्यंत अधिकारी पोहोचले नाहीत की फॅट मशिनची सत्यता तपासली नाही यात काहीतरी गौडबंगाल आहे. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यावर व्यापाऱ्यांनी जमा केलेले सोयाबीन शासन हमीभावाने खरेदी करणार काय? असा सवाल शेतकरी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)