ऐन उन्हाळ्यात वेळ नदी तहानलेली

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावरून वाहणारी वेळ नदी ऐन उन्हाळ्यामध्ये तहानलेली असून, या नदीवर असलेले सर्व बंधारे देखील कोरडे पडलेले असल्याने या भागातील विहिरी तसेच विंधन विहिरींची देखील पटली खालावली आहे, त्यामुळे लवकरच येथील नागरिकांना पाण्याचा दुष्काळ जाणवू शकतो त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करत आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथून वाहणाऱ्या वेळ नदीच्या पाण्यावर शिक्रापूर, जातेगाव, तळेगाव ढमढेरे येथील अनेक वाड्या-वस्त्यांवरील शेतीचे, तसेच नागरिकांचे जीवन पाणी स्रोतावर अवलंबून असते, येथील नदीला पाणी असल्यास या परिसरातील सर्व विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असत, त्यामुळे नागरिकांना देखील शेतीतील पिकांना पाणी देणे शक्‍य होत असते. या नदीचे बंधारे भरलेले असल्यास गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी वाढलेली असते त्यामुळे ग्रामस्थांना योग्य पाणी वाटप होत असते; परंतु सध्या वेळ नदी पूर्णपणे कोरडी पडलेली असून या नदीवर असलेले शिक्रापूर परिसरातील तीन बंधारे देखील कोरडे पाडलेले आहे तसेच उन्हाची तीव्रता वाढत चाललेली असल्यामुळे आता नागरिकांना पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे, येथील बंधाऱ्यावर पाणी असल्यास नागरिक तेथे जाऊन पोहण्याचा देखील आनंद घेत असतात परंतु नदीला कोठेही पाणी नसल्यामुळे नागरिकांना उष्णतेचा देखील सामना करावा लागत आहे, त्यामुळे येथील वेळ नदीला चासकमानमधून पाणी सोडण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

  • शिक्रापूर येथील वेळ नदीला पाणी सोडण्याबाबत विचार चालू असून, शेतीसाठी चाऱ्यांना पाणी सोडणार असून, चाऱ्यांचे झाल्यावर नदीला पाणी सोडण्यात येणार आहे.
    गौतम लोंढे, चासकमान विभागाचे कार्यकारी अभियंता

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)