ऐनवेळच्या निमंत्रणाने हुकला दिल्ली दौरा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यांना दिल्ली दौऱ्याचे ऐनवेळी निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे कोणतीही तयार न झाल्याने बहुतांशी सदस्यांना या दौऱ्याला मुकावे लागले आहे. “स्मार्ट सिटी’ पाहणीकरिता सर्व गटनेते मात्र या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. भाजपच्या या “ट्रीप डिप्लोमसी’ची महापालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरला आहे. ही पडझड रोखण्याचे मोठे आव्हान शिक्षण समितीसमोर उभे राहिले आहे. चार महिन्यांपूर्वी अस्तित्वात असलेल्या या समिती सदस्यांपर्यंत केजरीवाल सरकारच्या दिल्लीतील शैक्षणिक प्रयोगांची वार्ता पोहचली. केजरीवाल यांच्या या प्रयोगांनी सरकारी शाळांमधील पटसंख्या वाढल्याने, दिल्लीतील शाळा व्यवस्थापन पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांच्यासह महापौर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिवसना गटनेते राहुल कलाटे, प्रमोद कुटे, मनसे गटनेते सचिन चिखले, कैलास बारणे, नवनाथ जगताप, शाम लांडे, नीळकंठ पोमण आदी सहभागी झाले आहेत. या दौऱ्यात या शिष्ट मंडळाने स्मार्ट क्‍लासरूम व अन्य उपक्रमांची माहिती घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर हे देखील सोमवारी (दि. 8) रात्री विमानाने दिल्लीला रवाना झाले.

-Ads-

याबाबत शिक्षण समिती सदस्या अश्‍विनी चिंचवडे आणि विनया तापकीर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, या दौऱ्याच्या काही तास आगोदर दौऱ्यात सहभागी होण्याचे सांगण्यात आले. मात्र, अगदी ऐनवेळीच्या या निमंत्रणामुळे तसेच नियोजित कार्यक्रमांमुळे या दौऱ्यात सहभागी होता आले नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)