ऐनतपूर वीरभद्र उत्सव 15 -16 ऑगस्टला

श्रीरामपूर – तालुक्‍यातील ऐनतपूर-बेलापूर ग्रामस्थांच्यावतीने15 आणि 16 ऑगस्टला वीरभद्र उत्सवाचेआयोजन केलेआहे.

ऐनतपूर येथील वीरभद्र (बिरोबा) मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचेआयोजन करण्यात येणार आहे. 15 ऑगस्टला सकाळी होमहवन, रात्री आठ वाजता निळकंठ तरकासे यांचा गीतगंधा संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे. 16 ऑगस्टला सकाळी सहा वाजता रुद्राभिषेक होईल. सकाळी 9 वाजता जळगाव येथील मातृ-पितृकृपा सेवा आश्रमचे भाऊसाहेब आळेकर महाराज यांचेकीर्तन होणार आहे. महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऐनतपूर-बेलापूर ग्रामस्थांनी केलेआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)