ऐतिहासिक हजरत दिलावर खान दर्ग्याला मिळाणार गतवैभव

रजगुरूनगर– गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती व नुतनीकरणापासून वंचित असलेल्या राजगुरुनगर येथील ऐतिहासिक हजरत दिलावर खान दर्गा व त्यातील मशिदीच्या संवर्धनासाठी 3 कोटी 83 लाख रुपयांच्या कामांना भारतीय पुरातत्व विभागाकडून मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्यामध्ये 1 कोटी 47 लाख 78 हजार रुपयांचा निधीला मान्यता मिळाली असल्याची माहिती खासदार शिवाजी आढळराव पाटील यानी दिली.
राजगुरुनगर येथे कोरीव दगडी वास्तूचा उत्तम नमुना असलेला पुरातन इस्लामिक हजरत दिलावर खान दर्गा व मशीद आहे. या वास्तू 1613 मध्ये उभारण्यात आल्या आहेत. या कालावधीत राजगुरुनगर येथे औरंगजेबाची सुमारे 5 ते 6 किमी अंतरापर्यंत छावणी उभाराण्यात आली होती. या छावणीचे नेतृत्व औरंगजेबाचा सेनापती दिलावर खान यांच्याकडे होते. पुढे याच ठिकाणी दिलावर खानाचा मृत्यू झाला. त्यानंतर राजगुरूनगर येथे चुना व दगडांचा वापर करून या दोनवास्तू उभारण्यात आल्या. त्यातील दर्ग्याला दिलावर खानाचे नाव देण्यात आले. हे प्राचीन स्मारक 1958 मध्ये पुरातत्वीयस्थळ म्हणून केंद्रीय पुरातत्व विभागाने घोषित केले. त्यातील स्मारक, आणि पुरातत्वीय स्थळे, अवशेष जतन केले गेले. या वास्तूच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी मात्र, निधी मिळत नव्हता. अनेक पुरातन अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर मोठ्या वास्तूंची पडझड झाली आहे. मात्र, पुरातत्व विभागाकडून त्यासाठी निधी मिळत नव्हता.
केंद्रीय पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना याबाबत केंद्रीय पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती. आढळराव पाटील यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांकडे याबाबत सततचा पाठपुरावा केला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या सोबत 11 सप्टेंबर 2017 रोजी चर्चा व निधी मिळण्याबाबत बैठक घेवून लक्ष वेधले होते. सातत्याने पाठपुरावा केल्यावर या कामासाठी 3 कोटी 83 लाख रुपयांच्या दुरुस्ती आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्यात होणाऱ्या कामासाठी 1 कोटी 47 लाख रुपयांच्या कामाना पुरातत्व विभागाने मान्यता दिली. याबाबत केंद्रीय पुरातत्व विभाकडून दि 23 ऑगस्ट 2018 रोजी मुंबई पुरातत्व विभागाकडे निधी वर्ग केल्याचे पत्र पाठविले होते. या निधीद्वारे दिलावर खाना दर्गा, मशीदीचा ढाचा संवर्धनाची तसेच बाहेरील भिंतीच्या डागडूजीची कामे केली जाणार आहेत. पुढील दोन वर्षांत ही कामे पूर्ण होतील असे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले.

  • हजरत संवर्धनासाठी नवी दिल्ली येथे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. पुरातत्व विभागाने यासाठी निधी उपलब्ध केला आहे. येथील दर्ग्याच्या पहिल्या टप्यातील कामांना मंजुरी मिळाल्याने आमच्या प्रयत्नाना यश मिळाले आहे. लवकरच हे काम सुरु केले जाईल.
    – शिवाजी आढळराव पाटील, खासदार
  • दर्ग्यात अवैध धंदा करणाऱ्यांचा वावर
    सण वगळता इतर दिवशी दर्ग्यात कोणीही फिरकत नसल्याने अवैध धंदे करणारांचा येथे मोठा वावर वाढला आहे. त्यांच्या वावरामुळे येथील ही ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी कोणाचे धाडस होत नव्हते. या दर्ग्याचे आणि घुमटाचे सौंदर्य नष्ट होऊ नये म्हणून राजगुरुनगर शहरातील मुस्लीम बांधवांनी अनेकदा पुरातत्व विभागाला आणि महाराष्ट्र शासनाला निवेदने सादर केली आहेत तरी देखील त्याची दखल कोणी घेत नव्हते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)