ऐतिहासिक सिमला शिखर परिषद 

माधव विद्वांस 

ऐतिहासिक सिमला शिखर परिषदेला आज 28 जून रोजी 46 वर्षे पूर्ण होत आहेत. सन 1971 मध्ये पाकिस्तानने भारताकडून युद्धात सपाटून मार खाल्ला. तसेच इंदिरा गांधी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या बुद्धिमतेचा ठसाही उमटविला. युद्धास सुरुवात करण्याआधी त्यांनी रशियात जाऊन केलेला मैत्री करार, त्यापाठोपाठ बांगलादेशला मान्यता देऊन लढाईचे रणशिंग फुंकले. या युद्धाचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होऊन त्याचे दोन तुकडे झाले आज त्यामुळे भारताचे पूर्व सीमेवर शांतता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या लढाईत 93000 हजार पाकिस्तानी युद्धबंदी झाले. अवघ्या 13 दिवसांच्या लढाईत पाकिस्तानचे तीन-तेरा वाजले त्याच्या रोमांचकारी कथा अनेक दिवस भारतीय लोक आठवीत होते. यावेळी इंदिराजींची मुत्सद्देगिरी व भारतीय लष्कराचे डावपेच पाकिस्तानचे हुकूमशहा याह्या खान यांना भारी पडले . दिनांक 20 डिसेंबर 1971 रोजी याह्या खान यांनी राजीनामा दिला व झुल्फिकार अली भुट्टो यांनी राष्ट्रप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर भारत-पाक द्विपक्षीय बोलणी होण्यास 28 जून 1972 ही तारीख उजाडली. भुट्टो यांची पत्नी आजारी पडल्याने त्यांची 19 वर्षीय कन्या बेनझीर त्यांच्याबरोबर आल्या होत्या. बेनझीर यांनी आपल्या ‘डॉटर ऑफ़ द ईस्ट’ या आत्मचरित्रामध्ये त्यावेळचे अनुभव लिहिले आहेत.

इंदिरा गांधींचे एके काळचे सचिव पी. एन. धर त्यांच्या ‘इंदिरा गांधी, द एमरजेंसी एंड इंडियन डेमोक्रेसी’ या पुस्तकात लिहितात, “त्यावेळी सिमला परिषदेची तयारी कशी झाली आहे हे पाहण्यासाठी आदल्या दिवशीच इंदिराजी सिमल्यात आल्या होत्या. त्यांनी सर्व पाहुण्यांची व्यवस्था कशी आहे पाहून घेतले. त्यावेळी व्यवस्थेसाठी वापरलेली सर्व सामग्री भारतीय होती, हे पाहून त्या खुश झाल्या व म्हणाल्या ‘भुट्टो को पता होना चाहिए की भारत की अर्थव्यवस्था लोगों की ज़रूरतें पूरा करने में सक्षम है.’

धर पुढे लिहितात दुसऱ्या दिवशी भुट्टो आल्यावर त्यांच्या खोलीत इंदिराजींचा फोटो पाहून संतापले व हा फोटो हटविला. दिनांक 28 जून ते 2 जुलै अशी पाच दिवस शिखर परिषद होऊन “सिमला करार’ अस्तित्वात आला. त्यावर भारताच्या वतीने पंतप्रधान इंदिरा गांधी व पाकिस्तानच्या बाजूने झुल्फीकार अली भुट्टो यांनी सही केली. यावेळी पाकिस्तानचे 93 हजार सैनिक व ताब्यात घेतलेला भूभाग परत द्यावा लागला. या कराराने प्रत्यक्षात भारताच्या हातात काहीही पडले नाही. मात्र, या युद्धातून बांगलादेशची निर्मिती व पूर्व सीमेवरील मोठा लष्करी खर्च वाचला, हेच समाधान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)