ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे भाग्य उजळणार

????????????????????????????????????

जिल्हाधिकारी द्विवेदी यांचा पुढाकार : तब्बल अडीच तास केली पाहणी
नगर – विविध ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्याचे भाग्य उजाळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांसमवेत तसेच राज्य शासनाच्या विविध यंत्रणांसोबत या किल्ल्याची तब्बल अडीच तास पाहणी केली. भुईकोट किल्ला सुशोभिकऱणासाठी तातडीने कार्यवाही कऱण्यात येईल. भुईकोट किल्ला सुशोभिकरण आणि विकासासाठी बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) बनवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सायंकाळी 4 वाजता लेफ्टनंट कर्नल एस. के. बारु, एस. वर्मा, राजबीर सिंग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, इतिहास अभ्यासक भूषण देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, सहायक नियोजन अधिकारी दातीर यांच्यासह संपूर्ण किल्ला पाहिला. अनेक महत्त्वाचे नेते येथे बंदिवासात होते, त्या लीडर्स ब्लॉकलाही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी भेट दिली. त्यानंतर येथील सर्व बुरुज, आतील बांधकाम, विविध ठिकाणची पाहणी त्यांनी केली. यावेळी इतिहास अभ्यासक देशमुख यांनी त्यांना या किल्ल्यासंदर्भातील विविध घटनांची माहिती दिली.
या ऐतिहासिक किल्ल्‌याचे जतन चांगल्या प्रकारे होणे आवश्‍यक आहे, त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात या किल्ल्याचे बाह्यरुप सर्वांना चांगल्या प्रकारे दिसावे यासाठी चारही बाजूंनी किल्ल्याला वेढलेल्या झाडेझुडुपे काढण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्युतीकरणाच्या आकर्षक रोषणाईने रात्री किल्ला उजळला जाणार आहे. या ऐतिहासिक किल्ल्याच्या जतनासाठी जसे राज्य शासन आणि सैन्यदलाचा विभाग प्रयत्नशील आहे, तसाच हा ठेवा जतन करण्याची जबाबदारी नागरिकांचीही असल्याचे त्यांनी सांगितले.

तटबंदीच्या आवारात राबवणार स्वच्छता मोहीम
भुईकोट किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित राखण्यासाठी येथे सर्वात प्रथम स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणाऱ आहे. बाहेरुन प्रत्येकाला या किल्ल्याचे भव्य रुप नजरेस पडावे, यासाठी तटबंदीच्या आसपास जी झाडेझुडुपे वाढली आहेत, ज्याने तटबंदीला धोका पोहोचू शकतो, यासाठी तटबंदीच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)