ऐतिहासिक घटनांची दुर्मिळ कागदपत्रे हाती…

पुणे – इतिहासकालीन छत्रपती शाहू महाराज आणि पानिपतच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहिती देणाऱ्या वेगवेगळ्या घटनांची नोंद दर्शविणारी चार दुर्मिळ पत्रे हाती लागली आहेत. आजवर या पत्रांचा कुठेही उल्लेख नसल्याने भविष्यात इतिहास संशोधनासाठी याचा उपयोग होणार असल्याचा दावा, इतिहास संशोधक घनश्‍याम ढाणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी वसंत चरिटेबल फाउंडेशनच्या रजनी इंदुलकर, विक्रांत इंदुलकर यावेळी उपस्थित होते.

ढाणे म्हणाले, वसंत चरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ऐतिहासीक घराणी, शिवोत्तर कालीन सरदार, वतनदार घराणी यांचा शोध घेऊन महत्त्वाची माहिती जाणून घेण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान छत्रपती शाहू कालीन व पानिपतविषयी नव्याने भाष्य करणारी एकूण चार पत्रे आढळून आली आहेत. चार पत्रांपैकी दोन पत्रे महादजी सालोंखे यांच्या विषयीची असून छत्रपती शाहू महाराजांनी पत्नी सगुणाबाई यांच्या नावे असलेल्या इनाम जमिनींचा कारभार त्यांच्याकडे सोपविल्याचा दाखला दिला आहे.

-Ads-

तसेच, तिसऱ्या पत्रात मराठे विरुध्द अब्दाली यांच्यातील पानिपत लढाईचा उल्लेख असलेले इनाम पत्रे सापडले आहे. तर, चौथ्या पत्रात जयाजी शिंदे यांनी पानिपत युध्दाच्या नांदी पुर्वी लिहिले असून पानिपतच्या आधी मराठा सैन्याच्या व आब्दालीच्या सैन्याच्या हालचालीवर प्रकाश टाकणारे महत्त्वपूर्ण पत्र असल्याचेही ढाणे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)