ऐतिहासिक…! ‘कॉमनवेल्थ’ मध्ये पहिल्यांदा बॅडमिंटनपटू बनणार ध्वजवाहक

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधूकडे भारतीय पथकच्या ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गेल्या तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या बॅडमिंटनपटूला ध्वजवाहकाचा मान मिळणार आहे. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिली होती. तर २०१४ मध्ये ग्लास्गोत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूला कांस्य पदकावर समाधान मानाव लागले होते. आता सिंधू या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आपल्या पदकाचा रंग बदलण्यात यशस्वी होते का? ते पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)