ऐकीव जि.प शाळेचा देश पातळीवर डंका

शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रमासाठी निवड

ठोसेघर – केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयमार्फत राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन आणि नेतृत्व विकास केंद्र कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या सेलिब्रिटींग स्कूल लिडरशीपसाठी देशातील शंभर शाळांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तीन शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जावळी तालुक्‍यातील दुर्गम भागातील ऐकीव जिल्हा परिषद शाळेची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कास पुष्प पठाराच्या पश्‍चिमेला जावळी तालुक्‍यातील दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या ऐकीव जि. प. शाळेतील शिक्षक सुरेश सपकाळ, मनीषा सातघरे, पुजा प्रभुणे व मुख्याधापक प्रकाश धनावडे यांच्या कल्पकतेने शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. शाळेचा स्वच्छ व सुंदर परिसर, मैदानी खेळांसाठी अग्रक्रम, वृक्षारोपण, वन्य पशू व पक्षांचे संवर्धन, संगणक शिक्षण, शिष्यवृत्ती, परसबाग, बोलका व्हरांडा, विद्यार्थीचे वाद्यवृंद, लेझीम पथक, सांस्कृतिक कार्यक्रम यांसारखे उपक्रम शाळेत राबविले जातात. सुरूवातीला एका खोलीत सुरू झालेल्या शाळेच्या दैदिप्यमान जडणघडणीत शाळेच्या शिक्षकांची धडपड त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेल्या श्रमदान, आथिर्क व वस्तू रूपाने मदत याचा मोठा वाटा आहे.

प्राथमिक शाळांना लागलेली घरघर व गळती रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.
त्याच अनुषंगाने मानव संसाधन विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन आणि नेतृत्व विकास केंद्र कार्यक्रमाअंतर्गत देशभरातून निवडलेल्या शंभर शाळांच्या मुख्याध्यापकांची राष्ट्रीय शैक्षणिक परिषद दिल्लीत 22 आणि 23 जानेवारीला सुरू आहे. या परिषदेत शाळेच्या जडण-घडणीची सक्‍सेस स्टोरी विषयी माहिती देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश धनावडे सध्या दिल्लीला गेले आहेत. ऐकीव जिल्हा परिषद शाळेने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुरेश सपकाळ, मनीषा सातघरे, पुजा प्रभुणे मुख्याध्यापक प्रकाश धनावडे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांसह शिक्षण अधिकाऱ्यांचे शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)