ऐकण्याच्या समस्येवर श्रवणयंत्र एक अलंकारच

ऐकण्याच्या समस्यांचे उपाय आता एकाच ठिकाणी सर्व अत्याधुनिक सुविधांसहित सुसज्ज असणारे सातारा जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणजे एम. ए. घाडगे स्पीच ऍण्ड हिअरिंग क्‍लिनिक. सुशिक्षित ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपीस्ट, तसेच पुण्यातील नामांकित हॉस्पिटलचा दहा वर्षांच्या कामाचा अनुभव असणारे ऑडिओलॉजिस्ट राजकुमार अनिल घाडगे हे गेल्या पाच वर्षापासून “विझिज’च्या माध्यमातून सहभागी होते. आता कायमस्वरूपी सातारा जिल्हावासियांच्या सेवेमध्ये उपस्थित असणार आहेत. श्रवणदोषावरती आणि वाचा व भाषा उपचारावरती सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

कान एक महत्वाचे इंद्रिय आहे. रोजच्या जीवनामध्ये कान एक महत्वाचा अवयव आहे. ऐकायला येत असल्यामुळे आपल्याला निसर्गातील वेगवेगळ्या आवाजांचा आनंद घेता येतो. समाजामध्ये आपल्याला कोणत्याही आनंद उत्सव कार्यामध्ये आपले जीवन हे आनंदमय होते. जगातील दहा टक्‍के व्यक्‍तींना श्रवणदोषाची समस्या भेडसावत असते. त्यापैकी 60 वर्ष वयाच्या दहा व्यक्‍तीपैकी नऊ व्यक्‍तींना श्रवणदोषाची समस्या भेडसावत असते. त्यापैकी 95 टक्‍के लोकांना श्रवणयंत्राचा फायदा हा निश्‍चित होतो. श्रवणदोषाची कारणे लक्षात घेतली तर ही समस्या वाढते वयोमानानुसार काही लोकांमध्ये अनुवंशिकपणा दिसून येतो. ब्लडप्रेशर, डायबेटिस, सतत मोठ्या आवाजात काम करणे, तीव्र गोंगाटात काम करणे, अपघातामुळे होणारा श्रवणदोष, काही औषधांचे अतिसेवन केल्यामुळे श्रवणदोषाची समस्या उद्‌भवते. कानातून पू येणे, कानाच्या पडद्याला छिद्र असणे, पडद्याला इजा होणे, कानांची शस्त्रक्रिया ह्या बाबी देखील श्रवणदोषासाठी कारणीभूत आहेत. ही श्रवणदोषाची प्रमुख कारणे आहेत. श्रवणदोषामुळे ऐकायला कमी येत असल्यामुळे शब्द गळून जाणे, बोलताना स्वतःचा आत्मविश्‍वास कमी होणे, ऐकायला कमी येत असल्यामुळे चार-चौघात संवाद साधताना अडचण येणे, समोरच्या व्यक्‍तिला परत- परत विचारणे किंवा मोठ्याने बोलायला सांगणे, ऐकायला कमी येत असल्यामुळे टीव्ही किंवा रेडिओचा आवाज वाढवणे, फोनवरचा संवाद व्यवस्थित न समजणे, गर्दीच्या किंवा गोंधळाच्या ठिकाणी किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये शब्द किंवा वाक्‍य व्यवस्थित न कळणे, पाठीमागून आवाज दिल्यास किंवा बोलल्यास काही शब्दांमध्ये अडचण येण, कानातून शिट्टीसारखा आवाज येणे या सर्व प्रकारच्या समस्यांवरती अत्याधुनिक श्रवणयंत्राद्वारे सहजपणे मात करता येते.

श्रवणयंत्र निवडताना तुमची वय व तुमची शारीरिक स्थिती, श्रवणदोषांचे मूल्यांकन ऐकण्याची गरज लक्षात घ्यायला हवी. श्रवणयंत्र प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळे असते. ते सर्वांसाठी एकच नसते. श्रवणयंत्र हे श्रवणदोष तज्ञांच्या सल्यानुसार घ्यावे. अत्याधुनिक श्रवणयंत्र हे गोंगाटविरहीत आहेत. त्यामध्ये कानाच्या आतील व कानाच्या मागील न दिसणारे आहेत. श्रवणदोषामुळे येणारे मानसिक दडपण आपण अत्याधुनिक श्रवणयंत्राने दूर करू शकतो. ऐकण्याच्या समस्यांमध्ये लहान मुलांमध्ये काही इन्फेक्‍शनमुळे त्रास उद्‌भवतो, जास्त प्रमाणात कावीळ होणे. ताप मेंदूपर्यंत जाणे, जन्मजात वजन कमी असणे, नात्यांमध्ये लग्न होणे, अनुवंशिकपणा असणे या समस्यांमुळे लहान मुलांमध्ये श्रवणदोष आढळतो. अशा मुलांचे जर योग्य वेळी निदान झाले तर त्यांचे पुनर्वसन करणे सोपे जाते. येथे सर्व प्रकारच्या रुग्णांसाठीचे सर्व प्रकारचे गोंगाटविरहीत व नामांकित कंपन्यांची अत्याधुनिक श्रवणयंत्रे उपलब्ध आहेत. सर्व प्रकारचे वाचा व भाषा उपचार उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या श्रवणदोष तपासण्या उपलब्ध आहेत. श्रवणयंत्रावर खास सवलत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)