“ए प्लस’ महाविद्यालयांना “रुसा’कडून निधी मिळावा

पुणे – पारंपरिक महाविद्यालयांनी मुल्यांकनात 3.5 पेक्षा अधिक श्रेणी मिळविली आहे, त्यांच्याकडून स्वायत्ततेची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अधिक श्रेणी मिळविल्याने, ती महाविद्यालये राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात “रुसा’च्या निधीपासून वंचित राहतील. या महाविद्यालयांनाही रुसाकडून निधी मिळावा, अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने रुसाच्या राज्य संचालकांकडे केली आहे.

रुसाकडून महाविद्यालयांना दोन कोटी रुपयांचा निधी दिला जातो. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी चार तास लिंक खुली करण्यात आली होती. प्रस्ताव सादर करताना ज्या महाविद्यालयांनी मुल्यांकनात 2.5 ते 3.5 या दरम्यान श्रेणी मिळविली आहे, त्यांचे प्रस्ताव पात्र झाले. मात्र मुल्यांकनात 3.5 पेक्षा अधिक श्रेणी अर्थात “ए प्लस’ श्रेणी मिळविली, त्यांचे प्रस्ताव मात्र अपात्र झाले. त्यामुळे “ए प्लस’ श्रेणी मिळविले महाविद्यालये रुसाच्या निधीपासून वंचित राहणार असल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी नाराजी व्यक्‍त करीत विद्यापीठांकडे आपले म्हणणे मांडले. महाविद्यालयांच्या आलेल्या तक्रारीनुसार पुणे विद्यापीठाने मुंबई येथील रुसाच्या संचालकांनाही पत्र पाठविले. त्यात प्र-कुलगुरू एन. एस. उमराणी म्हणाले, पुणे विद्यापीठाने रुसाच्या निधीसाठी जास्तीत जास्त महाविद्यालयाने प्रस्ताव सादर करावेत, यासाठी कार्यशाळा घेतली होती. त्यात महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे “ए प्लस’श्रेणी मिळविलेले महाविद्यालये स्वायत्ततेसाठी पुढे येत आहे. त्यांची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यानच्या कालावधीत अधिक श्रेणी मिळविलेल्या महाविद्यालयांना रुसाकडून निधी मिळणे आवश्‍यक आहे. त्याचा रुसाने विचार करावा, याकडे त्यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)