एस वळणार पुन्हा अपघात; दोघे ठार

शिरवळ – ग्वाल्हेर-बंगलोर आशियाई महामार्ग 47 वरील खंबाटकी घाटामध्ये एस आकाराच्या वळणावर अज्ञात वाहनाला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या एस वळणावर आत्तापर्यंत 76 जणांचा बळी गेला आहे. याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, निलेश मानाजी भवर (वय 32) हे लहुराज हणमंत चव्हाण (वय 30 दोघे रा. सुरूर ता.वाई ) यांना बरोबर घेऊन आपल्या दुचाकीवरून (एमएच-11-एएस-6285) म्हावशी ता.

खंडाळा याठिकाणी ट्रॅक्‍टरचालकाला जेवणाचा डबा घेऊन जात असताना रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान खंबाटकी घाटातील एस वळणावर आले. यावेळी पुढे निघालेल्या अनोळखी वाहनास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्याचे समजताच खंडाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांना खंडाळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेची फिर्याद चारुदत्त चव्हाण यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड हे करीत आहे. दरम्यान, शिरवळ ता.खंडाळा येथील एका मंगल कार्यालयासमोर काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात संभाजी शिवाजी आंबवले (वय 28 सध्या रा. शिंदेवाडी ता.खंडाळा मूळ रा. कर्नावड ता. भोर जि. पुणे ) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी हे करीत आहे.
दरम्यान, या एस वळणावर आत्तापर्यंत 76 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे हे वळण काढण्यासाठी प्रशासनावर मोठा दबाव टाकण्यात आला होता.

अखेर हे वळण काढण्याचा शासन पातळीवर निर्णय झाल्यानंतर त्याचे भूमिपूजन उद्या (रविवार) 23 रोजी होणार आहे. असे असताना या एस वळणाच्या भूमीपूजनाच्या आदल्या दिवशीच या वळणाने दोघांचे बळी घेतल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. शासनाने केवळ भूमीपूजन करून न थांबता तत्काळ एस वळण काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी यानिमित्ताने नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)