एस. बी. शशांक निवडणूक आयोगापुढे हजर होणार 

ऐझॉल: मिझोरामचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. बी शशांक हे पक्षपाती भूमिका घेत आहेत असा त्यांच्यावर अनेक सामाजिक संघटनांनी आणि मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनीच केल्याने त्यांना निवडणूक आयोगाने चौकशीसाठी समन्स जारी केले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगापुढे ते उद्या गुरूवारी हजर राहणार आहेत.

मिझोराम मध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रकिया सुरू आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांना हटवण्याची मागणी राज्य सरकारनेच केली आहे. त्यांच्या विरोधातील तक्रारींची शहानिशा करण्यासाठी निवडणूक आयोगाचे पथकही तिकडे पाठवण्यात आले आहे. त्यांना त्वरीत हटवण्यात यावे या मागणीसाठी यंग मिझो असोशिएशनचे शेकडो कार्यकर्ते शशांक यांच्या कार्यालयाबाहेर धरणे धरून बसले आहेत.

राज्याच्या पहाणी दौऱ्यावर आलेल्या निवडणूक आयोगाच्या समितीशी पत्रकारांनी संवाद साधला त्यावेळी या समितीच्या सदस्यांनी सांगितले की, शशांक यांच्या विषयीचा निर्णय आता दिल्लीत निवडणूक आयोगच घेईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)