एस.बालन, पीएमसी संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला

एस. बालन करंडक आंतर क्‍लब अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे: एस.बालन ग्रुप आणि पीएमसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून येथे सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि पुनित बालन एन्टरटेन्मेंट आणि स्टेडियम क्रिकेट क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एस. बालन करंडक आंतर क्‍लब अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनाचा दिवस गाजवला.
डेक्कन जिमखाना मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे संचालक पुनित बालन यांच्या हस्ते झाले. पहिल्या सामन्यात राज राठोडच्या 66 धावांच्या खेळीच्या जोरावर एस. बालन ग्रुपने परब क्रिकेट ऍकॅडमीचा 26 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा खेळताना एस. बालन ग्रुपने 20 षटकात 9 गडी गमावून 136 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये राज राठोडची 66 धावांची खेळी निर्णायक ठरली. परब क्रिकेट ऍकॅडमीने 20 षटकात 9 गडी गमावून 110 धावा केल्या. अनिश गायकवाड 22, विकी अवघडे 19, मोहम्मद अब्दुल्ला 18 यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही.
दुसऱ्या सामन्यात लक्ष्मीकांत शिंदे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीएसमी संघाने 107 धावांनी सहज विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पीएमसी संघाने 18 षटकात 6 गडी गमावून 175 धावांचा डोंगर उभा केला. राजेश सुतार (62 धावा), किसन बगाडे (26), लक्ष्मीकांत शिंदे (18) यांनी संघाला पावणे दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना सरदार बाजीप्रभु देशपांडे इलेव्हन संघाचा डाव 15.1 षटकात व केवळ 68 धावांवर आटोपला. पीएमसीच्या लक्ष्मीकांत शिंदे याने 13 धावात 4 गडी बाद करत आघाडीची फळी कापून काढली. विनित पटेलिया याने 4 धावात 4 बाद करून संघाला झटपट विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

सविस्तर निकाल 
गटसाखळी फेरी – एस. बालन ग्रुपः 20 षटकात 9 गडी बाद 136 धावा (राज राठोड 66 (62, 6 चौकार), अभिषेक सुपेकर 19, कौस्तुभ बाठे 2-18) वि.वि. परब क्रिकेट ऍकॅडमीः 20 षटकात 9 गडी बाद 110 धावा (अनिश गायकवाड 22, विकी अवघडे 19, मोहम्मद अब्दुल्ला 18, विकी भोज्जा 3-18); सामनावीरः राज राठोड;
पीएमसीः 18 षटकात 6 गडी बाद 175 धावा (राजेश सुतार 62 (31, 6 चौकार, 3 षटकार), किसन बगाडे 26, लक्ष्मीकांत शिंदे 18, जयेंद्र बारबे 2-22) वि.वि. सरदार बाजीप्रभु देशपांडे इलेव्हनः 15.1 षटकात 10 गडी बाद 68 धावा (मुकूल यादव 15, लक्ष्मीकांत शिंदे 4-13, विनित पटेलिया 4-4); सामनावीरः लक्ष्मीकांत शिंदे;

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)