“एस.पी.’ज बिर्याणी फेस्टिव्हल’ सुरू

पुणे – चटकदार बिर्याणीचे खवय्यांचे पुरेपुर लाड पुरविणाऱ्यासाठी “एस.पी.’ज बिर्याणी फेस्टिव्हल’ सुरू झाला आहे. दि.24 ऑक्‍टोबरला सुरू झालेला हा फेस्टिव्हल’ 30 नोव्हेंबरपर्यंत खवय्यांना हवाहवासा वाटणारा असून फेस्टिव्हलचे हे यंदाचे आठवे वर्ष आहे.

या धमाकेदार स्वादिष्ट बिर्याणी फेस्टिव्हलमध्ये कश्‍मिरीपासून कराचीपर्यंत, लखनवीपासून दुबईपर्यंत, बोहरीपासून बलुचीपर्यंत, कच्छीपासून इराणीपर्यंत, आखणीपासून अफगाणीपर्यंत जगभरातील व्हेज आणि नॉनव्हेज मौल्यवान बिर्याणींचा नजराणा सादर केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“मटण मोघलाई दम बिर्याणी’, “मटण कच्छी दम बिर्याणी’, “मटण साजूक दम बिर्याणी’, “मटण फुल मुर्ग बिर्याणी’, “एस.पी’ज मटण दम बिर्याणी, “महाराजा मटण दम बिर्याणी’, “आखणी मटण दम बिर्याणी’, “फुल लेग मटण दम बिर्याणी’ तसेच “सुफियानी मटण दम बिर्याणी’ यांना तुफान प्रतिसाद लाभत आहे. याबरोबरच “साजूक चिकन दम बिर्याणी’, “गावरान चिकन दम बिर्याणी’, “अंडा बिर्याणी’ अशा अनेक उत्तमोत्तम बिर्याणींनी या फेस्टिव्हलमध्ये घमघमाट सोडला आहे. या सर्व बिर्याणींची लज्जत अधिकच वाढते ती, बिर्याणीसाठी वापरण्यात येणाऱ्या दर्जेदार व उच्चप्रतिच्या सामग्रीमुळे. तसेच संपूर्ण फॅमिलीसाठी “एसपीज्‌’ने व्हेज व नॉनव्हेज फॅमिकी पॅक बिर्याणीही उपलब्ध केली आहे.

पुण्यातील एकमेव असे “एसपीज्‌’चे तीन मजली सेंट्रल एसी फॅमिली बिर्याणी हाऊस आहे. प्रसन्न वातावरण, हसतमुख आणि उत्कृष्ट आदरातिथ्य करणारा सेवकवर्ग यामुळे या चमचमीत मेजवानीची लज्जत अधिकच वाढते. तेव्हा या आणि जगभरच्या बिर्याणींचा मसालेदार अनुभव लुटा, असे आवाहन “एस.पी’ बिर्याणी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)