एस. टी. महामंडळाविरोधात 20 रोजी विद्यार्थ्यांचा पालकांसोबत रास्तारोको

मसूर – शासनाच्या मोफत पास योजनेला कराड तालुक्‍यात एस.टी. महामंडळाच्या काही मनमानी महाभागाकडून जाणिवपूर्वक कोलदांडा मिळत असल्याने ग्रामीण भागातील शालेय मुला-मुलींची अक्षरशः ससेहोलपट होत आहे. एस. टी. महामंडळाच्या निषेधार्थ मसूर भागातील संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांच्या वतीने गुरूवार दि. 20 डिसेंबर रोजी मसूर येथे रास्तारोकोचा इशारा दिला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनाने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोफत पास योजना अंमलात आणली. एस. टी. महामंडळाच्या काही आडमुठ्या कंडक्‍टरांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थिनींना अतोनात त्रास सहन करावे लागत असून त्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी गत महिन्यापासून पालक व विद्यार्थ्यांतून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मसूर भागातून कराड येथे शिक्षणासाठी 200 हून अधिक मुले व मुली दररोज ये-जा करतात. शासनाने शालेय मुलांसाठी मोफत पास योजना राबविली आहे. पण हा पास सकाळी कराडला जाताना चालतो. सकाळी विद्यार्थी वेळेत जातात मात्र सायंकाळी पाचनंतर मसूरला कराडहून येणाऱ्या बहुतांशी एस. टी. बस जाणिवपूर्वक नाका व कॉलेजवर थांबतच नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना दोन-दोन तास ताटकळत बसावे लागते. कोरेगाव डेपोच्या एस. टी. ना हा पास चालतच नसल्याचा अलिखित नियम असल्यासारखा या गाड्या न थांबता सुसाट निघून जातात त्यामुळे विद्यार्थी नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घेतात. सायंकाळी 7 ते 8 वाजता मुले पोहोचतात. तोपर्यंत पाल्यांच्या प्रतिक्षेत बस स्टॅंडवर पालकांची गर्दी होते.

मसूरसह चिखली, निगडी, कवठे, कोणेगाव यासह वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गत महिन्यापासून एस. टी. बस थांब्यावर थांबत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्यामुळे शासनाची मोफत पास योजना असूनही काही एस. टी. वाहक व चालकांच्या मनमानीमुळे शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागण्याची वेळ येत आहे. याबाबत मसूर भागातील संतप्त पालक व विद्यार्थी वर्गाच्या वतीने एस. टी. महामंडळाच्या निषेधार्थ मसूरला रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रास्ता रोकोत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)