एस.टी महामंडळ खरेदी करणार नवीन ५०० बस

file photo

मुंबई: एस.टी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सर्वसामान्य नागरिक या बसमधून प्रवास करत असतात. त्यांचा हा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला नवीन ५०० बसेस  खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एस.टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिसिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी १२.५ कोटी रुपयांचा निधी नजीकच्या काळात तर उर्वरित निधी हा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल असे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, आज एस.टी बस ही ग्रामीण महाराष्ट्राचा आधार आहे. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एस.टी बसमधून प्रवास करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. महामंडळाने ही पुढाकार घेऊन एस.टी बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)