एस. टी., “पीएमपी’चे लाखोंचे नुकसान

पिंपरी – महाराष्ट्र बंदमुळे एस. टी., पीएमपीएमएलच्या बसेस दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन्ही वाहतूक सेवेला लाखोंचा फटका बसला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) वल्लभनगर आगारातील एकही बस मार्गावर धावली नाही. वल्लभनगर आगारातील बसची एकही फेरी न झाल्याने आगाराची 18 हजार 242 किलो मीटरच्या बस फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे साडेसहा लाखांचे नुकसान एस. टी. ला सोसावे लागले.

-Ads-

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कडून गुरुवारी 686 गाड्या मार्गावर बस सोडण्यात आल्या होत्या. मात्र आंदोलक आणि पोलिसांच्या सूचनेनुसार पीएमपीएमएल प्रशासनाने गाड्या परत बोलावल्या. सकाळी मार्गावर गेलेल्या पीएमपी बस पैकी 5 बसची आंदोलकांनी तोडफोड केली, त्यात 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर बसच्या 750 फेऱ्या रद्द झाल्याने दीड कोटींचे नुकसान झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)