एस. टी. तिकीट दर वाढीला विरोध

पिंपरी – एस. टी. महामंडळाने प्रस्तावित केलेल्या प्रवासी तिकीट दरवाढीला पिंपरी-चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

त्यात म्हटले आहे की, इंधन दरवाढ, कामगारांचा वेतन करार, व सुट्ट्या भागाच्या वाढत्या किंमतीचा भार एस. टी. महामंडळावर वाढला आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. ही दरवाढ प्रस्तावित करताना प्रवाशांच्या सुविधेचे काय, असा सवाल प्रवासी संघाने केला आहे.

एस. टी. ची भाडेवाढ न करता लालपरीला टोल मुक्त करावे, माफक दरात गाड्यांना इंधन उपलब्ध करुन द्यावे, लांब पल्ल्याच्या गाड्यांना चांगल्या सोई सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, चालक-वाहकांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करावे, असे प्रवासी महासंघाने सूचित केले आहे. निवेदनावर प्रवासी संघाचे अध्यक्ष विजय कदम, दत्तात्रय जाधव दीपक कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)