एस. टी.चे पिकअप स्टॅंड पाडले

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथील राज्य परिवहन महामंडळाचे एस. टी.चे पिकअप स्टॅंड अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी जे. सी. बी.च्या सहाय्याने पाडून टाकले आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसात एस. टी.ची वाट पाहावी लागत आहे.
मंचर-शिरुर रस्त्यालगत अवसरी खुर्द गावचे एस. टी. स्टॅंड आहे. हे स्टॅंड 45 ते 50 वर्ष जुने असल्याने इमारतीची पडझड झाली होती. अज्ञात व्यक्तीने दरवाजा, खिडक्‍या, बसण्याचे बाकडे चोरुन नेल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे रहावे लागत होते. याबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर एस.टी महामंडळाने अंदाजे 1 लाख रुपये खर्च करून स्टॅंडचा दरवाजा, खिडक्‍या व बाकडे बसविले. तसेच स्टॅंडची रंगरंगोटी केली. त्यामुळे प्रवाशांना बसण्याची चांगली सोय झाली होती.
मात्र, अज्ञात व्यक्तीने जे.सी.बी.च्या सहाय्याने स्टॅंड पाडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच नवीन स्टॅंड बांधकामासाठी होणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी स्थानिक प्रवाशांनी केली आहे. अज्ञात व्यक्तीने जागा बळकावण्याच्या हेतुने स्टॅंड पाडण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)