एस. टी. चा गल्ला भरण्यात पुणे विभाग अव्वल

पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) पुणे विभागाच्या आगारांनी यंदाच्या दिवाळीत मोठी कमाई केली आहे. सुगीचे दिवस असल्याने सर्वच आगार जादा महसुलासाठी जोर लावतात. त्यात पुणे विभाग अव्वल ठरला असून कमी किलोमीटर धावून चांगली कमाई या विभागाने केली आहे.

एस. टी. च्या पुणे विभागात शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, शिरुर, बारामती, बारामती एम.आय.डी.सी, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगार अशा 13 आगारांचा समावेश आहे. दिवाळी निमित्ताने विभागातील सर्वच आगारांनी 1 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत जोर लावला. गतवर्षी एस. टी. कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे अस्त्र उगारल्याने ऐन दिवाळीत मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्याचीच भरपाई करण्याचा संकल्प यावेळी सोडला होता.

पुणे विभागातील स्वारगेट व पिंपरी-चिंचवड चे वल्लभनगर आगार वगळले तर सर्वच आगाराला 2016 सालच्या तुलनेत जादा महसूल मिळाला आहे. 2016 च्या तुलनेत 1 लाख 64 हजार किलोमीटर इतके कमी अंतर गाड्या धावून सुद्धा 41 लाख 49 हजार रुपयांची जादा कमाई केली आहे. यावर्षी राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने महसूल मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. दिवाळी निमित्ताने दरवर्षी प्रमाणे राज्य परिवहन महामंडळाने 10 टक्के तिकिटात दरवाढ करण्यात आली होती.

यावर्षी प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच जादा गाड्या त्या-त्या मार्गावर सोडण्यात आल्याने महसूलात चांगली भर पडली, तसेच महसुलात शिवशाही बसने मोठे योगदान दिले आहे. लालपरीच्या तुलनेत शिवशाही बसला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कमी किलोमीटर गाड्या धावण्याचे कारण की यावर्षी दुसऱ्या आगारांच्या शिवशाही बस आपल्या आगारातून आरक्षित केल्याने किलो मीटर कमी झाले.
– यामिनी जोशी, नियंत्रक, पुणे एस. टी. विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)