एस. टी. घडवणार साडेतीन शक्‍तीपीठ दर्शन

पिंपरी – महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) वल्लभनगर आगारातून नवरात्रीनिमित्त साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.

गतवर्षी वल्लभनगर आगारातून साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी 3 विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यामाध्यमातून एस. टी. ला सव्वा दोन लाखांचे उत्पादन मिळाले होते. मागील वर्षीचा नागरिकांचा प्रतिसाद बघता यावर्षी आगार प्रशासनाने दोन गाड्या आणखी वाढवल्या आहेत. यावर्षी ऑक्‍टोबर (दि. 12) ला सकाळी सहा वाजता पाच गाड्या साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी निघणार आहेत. या गाड्यांची “बुकींग’ सुरु झाली असून आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही यात्रा तीन दिवसांची असून पहिल्या दिवशी कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन नागरिकांना मिळणार असून त्याच दिवशी तुळजापूर येथील तुळजा भवानीचे दर्शन व रात्रीचा मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी माहूरला रेणूका माता दर्शन होईल. याट ठिकाणी दुसरा मुक्‍काम होईल. तिसऱ्या दिवशी वणी येथील येथील चतु:श्रुंगी देवीचे दर्शन होईल. 15 ऑक्‍टोबर रोजी सकाळी सात वाजेता बस पुन्हा आगारात येतील. “ऑनलाईन बुकींग’ची सोय उपलब्ध असून एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरुन “बुकींग’ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

…असे आहे प्रवासी भाडे
– प्रौढ व्यक्‍ती – 2295 रुपये
– लहान मुले – 1150 रुपये
– अपंग व्यक्‍ती – 75 टक्‍के सवलत
– ज्येष्ठ नागरिक – 50 टक्‍के सवलत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)