एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट प्रा.लि मध्ये 124 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ

दरवर्षी होणार 1.8 लाख युनिट विजेची निर्मिती

संगमनेर : संगमनेरच्या एस.आर.थोरात मिल्क प्रॉडक्ट प्रा.लि.मध्ये स्थापित झालेल्या 124 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातुन होणाऱ्या वीज निर्मितीने या उद्योगसमूहाने अपारंपरिक ऊर्जेच्या वापराच्या बाबत मोठे पाऊल उचलले असून यामुळे पर्यावरण संवर्धनासाठीही मोलाची मदत होणार आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे चमकदार सूर्यप्रकाशात दररोज सुमारे 500 युनिट तर दरवर्षी 1.8 लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. दुध उद्योगातील चिलिंग प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. पण या सौर उर्जा निर्मितीमुळे या उदयोगास लागणाऱ्या एकूण ऊर्जेच्या 10 ते 15 टक्के वीज या प्रकल्पातून निर्माण केली जाणर आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आज संपन्न झाले. या प्रसंगी एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि चे चेअरमन आबासाहेब थोरात उपस्थित होते .

ही प्रणाली पुण्यातील सनशॉट टेक्नॉलॉजीजद्वारे स्थापित केली गेली असून छतावरील सौर स्थापनांमधील एक अग्रगण्य संस्था असणारया सनशॉट हि स्थापने नंतर ऑपरेशन आणि देखभाली चीही काळजी घेणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असून अश्या प्रकारच्या प्रकल्पामुळे स्थानिकांना विक्री पश्तात सेवा व तत्सम बाबी साठी रोजगारही उपलब्ध होणार आहे.

सदर सौर ऊर्जा प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान व प्रणाली वापरून उभारण्यात आला असून एकूण 2 9 0 मॉड्यूल्स मेटल शीट रूफटॉपवर तर 70 मॉड्यूल आरसीसी रूफटॉपवर बसवले आहेत. हे मॉड्यूल उच्च पॉवर मॉड्यूल आहेत . मॉड्यूल ‘PERC’ (Passivated Emitter Rear Cell) तंत्रज्ञानाचा वापर करतात-सेलच्या मागच्या बाजूला एक डायलेक्ट्रिक Passivation layer जोडला असून यामुळे अधिक प्रकाश शोषला जातो. मेटल शीट छप्परावर, सोलर पॉवर प्लांट उभारणे सोपे नसते कारण उभारणी दरम्यान मजुरांची सुरक्षा एक प्रमुख चिंता असते.

एस.आर.थोरात मिल्क प्रॉडक्ट प्रा.लि मधील छप्पराचा उतार सुमारे 15 अंश आहे. या करिता 0.8 मीटर उंच उंचीची सुरक्षितता रेलिंग स्थापन केली. तसेच, अतिरिक्त सुरक्षेसाठी, नायलॉनची सुरक्षा जाळीहि लावण्यात आली होती. सोलर पेनल स्वच्छ करण्यासाठी आधुनिक स्प्रिंकलर प्रणालीही येथे बसविण्यात आली आहे. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्यामुळे थेट सूर्याची किरणे छतावर न पडल्यामुळे खाली उष्म्याचे प्रमाण कमी होते तसेच १०० किलोवॅट सौर ऊर्जा निर्मितीने कार्बन उत्सर्जनच्या प्रमाणात कमालीची घट होते. ग्लोबल वार्मिंग चे घातक परिणाम कमी करण्यासाठी अपारंपरिक उर्जेच्या वापरावर आपण सर्वानीच भर देणे आवश्यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
24 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)