एसीमुळे होणारे त्रास

दैनंदिन जीवनात बारीकसारीक आरोग्याच्या कुरबुरी असतील, तर तुमच्या ऑफिसची वातानुकुलित यंत्रणा ऊर्फ एसी याला कारणीभूत असू शकतो. तुमच्या ऑफिसच्या एसीमुळे तुमचं आरोग्य बिघडत असल्याचं सांगणारे अनेक पुरावे इथल्या इथे देता येतील. म्हणूनच आजारी पडाल, तेव्हा फक्‍त काम करत राहण्याला दोष देऊ नका.

कोल्ड डिसकम्फर्ट : खूप वेळ जर तुम्ही गार ठिकाणी असाल, तर तुमचे सांधे आणि स्नायू यांना त्रास होतो. बहुतेक वेळा त्यानं मान आणि पाठ दुखते. ऑर्थोपेडिक आणि सांधे रिप्लेसमेंट तज्ज्ञ रामणिक महाजन यांच्या मते, जर तुम्हाला काही कारण नसताना खूप सांधेदुखी होत असेल, तर त्याचं कारण एअर कंडिशनिंग असू शकतं.

गुदमरणं : डॉ. हेमंत गोयल यांच्या म्हणण्यानुसार, एसी असलेल्या वातावरणात इन्फेक्‍शन होण्याची शक्‍यता जास्त असते. अशा वातावरणात जीवाणू, बुरशी, जंतू आणि इतर व्हायरस पसरतात. जे लोक अशा वातावरणात वावरतात, त्यांना डोकेदुखी, लवकर दम लागणं आणि गुदमरायला होतं.

कोरडे दिवस : गार हवेमुळे तुमचे डोळे आणि त्वचा कोरडी पडू शकते. जे लोक कॉन्टॅक्‍ट लेन्स घालतात, त्यांचे डोळे लवकर कोरडे पडू शकतात. हे टाळण्यासाठी डॉ. गोयल म्हणतात, की तुम्ही तुमचा ऑफिसचा एसी 22 डिग्रीवर ठेवू शकता. दर वेळेला सोबत एक जॅकीटही ठेवणं आवश्‍यक आहे.

एसीमुळे होणाऱ्या फायद्यांच्या मानानं त्यामुळे होणारे आजार जास्त मोठे आहेत. एसीमुळे आरोग्य बिघडतं हेही उघडच आहे. मात्र, एसी सोयीचा असतो. त्यानं हवेची गुणवत्ता वाढते. घामट होऊन आल्यानंतर किंवा उन्हातून गरम वातावरणातून आल्यानंतर एसीमुळेच थंडावाही मिळतो आणि बुद्धी आणि शारीरिक क्रिया वाढतात. याउलट एसीच्या वापरामुळे डोळे कोरडे होतात. त्यासाठी शरीरातील ओमेगा 3 डी या फॅटी ऍसिडचं सेवन करणं आवश्‍यक ठरतं.

एसीमध्ये काम करताना डोळ्यांची सतत उघडझाप करत राहणंही आवश्‍यक आहे. त्यामुळे होणारी डोकेदुखी टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणं आणि गरजेनुसार टोपीचा वापरही करायला हवा. एसीमुळे सर्वांत जास्त त्रास होतो, तो सांध्यांना. एका जागी खूप वेळ बसून राहिल्यानं तर हा त्रास सतत आणि वरचेवर जाणवतो. त्यामुळे एसी असलेल्या ऑफिसमध्ये काम करताना खुर्चीवर बसूनही अधेमधे हालचाल करत राहणं, उठून पुन्हा बसणं, चालणं या क्रिया आवश्‍यक आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)