एसबीआय सोडून सर्व बॅंकांचे खासगीकरण करा

 नीति आयोगाच्या माजी अध्यक्षांची सूचना

नवी दिल्ली – स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही बॅंक सोडून देशातील सर्व सरकारी बॅंकांचे खासगीकरण करण्याची गरज असल्याचे जोरदार प्रतिपादन नीति आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पानगडीया यांनी केले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात त्या विषयाचा समावेश करून सन 2019 च्या निवडणुकीनंतर या विषयी गांभीर्याने निर्णय घ्यावा अशी सुचनाही त्यांनी केली आहे.

बॅंकांमध्ये होणारे मोठमोठे घोटाळे पहाता या बॅंकांना वाचवणे आता सरकारच्या हाताबाहेर जात आहे असे चित्र सध्या निर्माण झाले आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही सुचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या बॅंकांवरील आपले नियंत्रण सरकारने सोडून दिले पाहिजे. या बॅंकांच्या कार्यक्षमतेचा आणि व्यावसायिकतेचा मोठा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. या बॅंकांमध्ये लोकांच्या हजारो कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. त्याचे व्यवस्थापन कार्यक्षम पद्धतीनेच व्हायला पाहिजे आहे असे त्यांनी म्हटले आहे. बॅंकांचे मुख्य काम दुर्लक्षित क्षेत्राला कर्ज पुरवठा करणे हे असते पण सरकारी बॅंकांपेक्षा खासगी बॅंकांनी ही जबाबदारी अधिक कार्यक्षमपणे पार पाडली आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे भारताच्या विकासगाथेचा बोजवारा उडेल असे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ प्रा क्रुगमन यांनी म्हटले होते त्याविषयी विचारले असता ते म्हणाले की त्यांचा निष्कर्ष योग्य आहे. देशाच्या विकासात निर्मीती क्षेत्राचे योगदान मोठेच असते. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशात सध्या अत्यंत कमी प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत त्यामुळे आपल्या युवकांच्या कार्यक्षमतेचे शोषण केले जाऊ शकते अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)