“एसबीआय’च्या एटीएमची मर्यादा आता केवळ 20 हजार 

मुंबई: स्टेट बॅंक ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून स्टेट बॅंकेच्या एटीएममधून आता एका दिवसात जास्तीत जास्त 20 हजार रुपये काढता येऊ शकणार आहेत. हा नियम 31 ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे.
एटीएममधून यापूर्वी दिवसभरात 40 हजार रुपये काढण्याची मर्यादा होती. पण यामध्ये येत्या 31 ऑक्‍टोबरपासून कपात होऊन ही मर्यादा 20 हजारांवर येणार आहे. हा निर्णय एटीएममधील फसवेगिरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच डिजिटल व्यवहारांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बॅंकेचा हा निर्णय किती योग्य आणि किती अयोग्य हे सांगणे अद्याप कठीण आहे. कारण, बाजारात सद्यस्थितीला रोख स्वरुपातील रकमेचे प्रमाण आधीपेक्षा जास्त आहे. एकावेळी एटीएममधून 20 हजार रुपये काढणे हे सर्वसामान्यांसाठी मुबलक आहे, असेही स्टेट बॅंकेने म्हटले आहे. ज्या ग्राहकांना यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल त्यांना बॅंकेकडून विशेष प्रकारचे कार्ड दिले जाणार असल्याचे बॅंकेने नमूद केले.
एटीएमच्या माध्यमांतून होत असलेल्या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आणि डिजीटल व्यवहारांना चालना मिळावा यासाठी पाऊल उचलल्याचे एसबीआयने सांगितले आहे. आगामी महिने सण-उत्सवांचे आहेत. या महिन्यात लोक आधिकाधिक एटीएमचा वापर करतात. आणि फसवणुकीचे शिकार होतात. अशा घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे.
सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असले तरी देशात रोख रकमेची मागणी वाढत आहे. ज्या ग्राहकांना जास्त पैशांची गरज असेल, त्यांनी जास्त मर्यादा असलेले डेबिट कार्ड घ्यावेत, असा सल्ला पी. के. गुप्ता यांनी दिला आहे. खात्यात जास्तीत जास्त किमान रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना अधिक मर्यादेचे डेबिट कार्ड दिलं जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)