‘एसपीएल’ स्पर्धा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतील

परळी: ठोसेघरसारख्या डोंगराळ, दुर्गम भागात “आयपीएल’च्या धर्तीवर “एसपीएल’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतील. व्हॉट्‌सऍप, फेसबुक ला जवळ करणारी तरुणाई आज क्रिकेटच्या मैदानात उतरत असल्याचे पाहून मनोमन आनंद होत असल्याचे मत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

ठोसेघर, ता. सातारा येथील स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले क्रिडा संकुलामध्ये समर्थ पठार लीग (एसपीएल) आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजुभैय्या भोसले, उद्योजक प्रकाश चव्हाण, बापूशेठ सपकाळ, सुनील वाईकर, शंकरराव चव्हाण, जयराम चव्हाण, अमित हुंबरे, अशोक काकडे, रघुनाथ चव्हाण, ठोसेघरचे सरपंच महादेव लोहार, उपसरपंच जयराम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, ठोसेघरसह पठारावरील सर्वच गावे स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. त्या ऋणाची उतराई म्हणून भाऊसाहेब महाराजांनी या भागाला नेहमीच झुकते माप दिले, विकासप्रक्रिया गतीने राबवली. भाऊसाहेब महाराजांच्या पश्चात येथील नागरिक माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आमदार फंडाच्या माध्यमातून शक्‍य तेवढी विकासकामे करण्यासाठी मी नेहमीच बांधील राहीन.पठारावरील गावातील प्रत्येक कुटूंबातील एक व्यक्ती मुंबई येथे नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहे. त्यामुळे या भागाला शहरीकरणाची चांगलीच ओळख झाली आहे. शिक्षणाची गंगा वाड्या-वस्त्यांवर पोहोचल्यामुळे प्रत्येकजण जगाशी परिचित होवू लागला आहे. आज व्हॉटस्ऍप, फेसबुक, ट्‌विटर, सोशल मिडियामुळे तरुणाई अत्यंत चाणाक्ष आणि हुशार होवू लागली आहे. या माध्यमांमुळेच डोंगरी भागातील अत्यंत चांगल्या संकल्पना साकारल्या जात आहेत, हे एसपीएलच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा भरवून येथील तरुणांनी खरेतर शहरी भागाच्या डोळ्यात एकप्रकाचे अंजनच घातले आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. पुढील वर्षी या स्पर्धेची व्याप्ती वाढवावी, अशी सूचना करुन येथील तरुणांना माझे नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.शंकरराव चव्हाण म्हणाले, ठोसेघरसारख्या ठिकाणी सलग तीन वर्षे अशाप्रकारच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आज तरुण माहिती, तंत्रज्ञानाकडे आकर्षित होत असले तरी त्यांचा मैदानी खेळावरील ओढा कमी झालेला नाही, हे या स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरुन स्पष्ट होत आहे. यावर्षी या स्पर्धा होवू नये म्हणून काहीजणांनी देव पाण्यात घातले होते. मात्र सत्याचाच विजय होतो, हे त्यांना आज जाणवल्याशिवाय राहिले नसेल. भविष्यकाळातील स्पर्धा आयोजित करण्यासाठी ठोसेघर ग्रामपंचायतीचे आवश्‍यक ते सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.प्रारंभी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला. तद्नंतर पहिला सामना इलेव्हन ब्लास्टर आणि राजे फायटर यांच्यात झाला. त्यामध्ये इलेव्हन ब्लास्टर विनर ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)