एसटी स्टॅंड ते सिव्हील रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य

वाहनचालकांसह पादचाऱ्यांचे होतायत हाल

सातारा,दि.24 (प्रतिनिधी) – शहरातील बहुतांश रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्वस्था झाली असून एसटी स्टॅंड ते सिव्हील हॉस्पिलटल रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्यच निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह व पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेवू घ्यावा लागत असून पालिकेने लवकरात लवकर रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे.
पोवईनाक्‍यावर ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे पर्यायी सर्वच रस्त्यांवर सध्या वाहनांचा कमालीच ताण येत आहे. तसाच ताण एसटी स्टॅंड ते सिव्हील हॉस्पिलटल रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात येत आहे. अशा स्थितीत रस्त्यावर दहा दहा फुटांच्या अंतरावर कमालीच्या खोलीचे व रूंदींच्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्या खड्डयांचा प्रचंड त्रास वाहनचालक व पादचारी नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्डे पडले आहेत. मात्र, आता पावसाळा ओलांडून जवळपास महिना उलटला आहे. तरी ही पालिकेकडून खड्डे डांबरीकरणाच्या माध्यमातून भरण्यासाठी कोणतेही पाऊले उचलली नाहीत. तर स्थानिक नगरसेवकांना ही मतदारांना होणाऱ्या त्रासाचे कोणते ही देणे घेणे नसल्याचा प्रकार दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)