“एसटी’ संवर्ग विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क प्रशिक्षण

 

प्रभात वृत्तसेवा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यातील अनुसूचित जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाणार आहे. एमपीएससी किंवा यूपीएसससी परीक्षांचे मार्गदर्शन नि:शुल्क स्वरुपात प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज माविण्यात येत आहे. प्रवेश परीक्षेच्या निकालानुसार प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील नऊ विद्यापीठात प्रवेशाची क्षमता प्रत्येकी 25 इतकी आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारास 4 हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन, तर प्रत्येक उमेदवारास 6 हजार रुपये किमतींचा पुस्तक संच देण्यात येणार आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

प्रवेशासाठी पात्रता निश्‍चित करण्यात आली. उमेदवार हा स्पर्धा परीक्षेसाठी पात्र असावा. त्याचे कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी असावा. उमेदवार अनुसूचित जमातीचा असावा. महिलांसाठी 30 टक्‍के, तर दिव्यांग व्यक्‍तीसाठी 3 टक्‍के जागा आरक्षित असतील. प्रवेशाबाबतचे सर्व अधिकार पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे राहणार आहे. ऑनलाईन अर्जासाठी पुढील संकेतस्थळ : https://maharecruitment.mahaonline.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)