एसटी रद्द झाल्यास ताबडतोब परतावा

मुख्यालयाचे आदेश : सर्व आगार प्रमुखांना सूचना

पुणे – एसटी बसमध्ये बिघाड झाल्यास अथवा काही कारणास्तव बसची फेरी रद्द झाल्यास आरक्षण केलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्याशिवाय या रकमेचा परतावा मिळण्यास त्यांना काही महिने वाट पाहावी लागते. पण, आता नवीन निर्णयानुसार प्रवाशांना आरक्षणाची रक्कम रोख स्वरुपात तातडीने देण्याचे आदेश मुख्य कार्यालयाने दिले आहेत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेकदा काही तांत्रिक बाबींमुळे महामंडळाचा प्रवासी दुरावत चालला आहे. या प्रवाशांनी आरक्षण केल्यास त्यांना दर्जेदार प्रवासी सेवा देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. परंतु, काही कारणास्तव बसची फेरी रद्द झाल्यास अथवा बसमध्ये बिघाड झाल्यास या प्रवाशांना आरक्षणाची रक्कम मिळण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागत होती. त्याशिवाय संबधित प्रवाशांच्या खात्यावर ही रक्कम जमा होत असल्याने त्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे यासंदर्भात बहुतांशी प्रवाशांनी थेट मुख्य कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार असा प्रसंग उद्‌भवल्यास या प्रवाशांना तत्काळ ही रक्कम त्याच आगारात परत देण्याचे आदेश सर्व आगार प्रमुखांना देण्यात आले आहेत. त्याबाबत महामंडळाच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)