एसटी महामंडळ 7 हजार चालक, वाहक जागा भरणार

पुणे – एसटी महामंडळाने चालक आणि वाहकांच्या तब्बल सात हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची प्रक्रिया या महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू होणार आहे. पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एसटी महामंडळामध्ये सद्यस्थितीत 18 हजार बसगाड्या असून एक लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये 38 हजार चालक आणि 34 हजार वाहक आहेत. सध्याच्या परिस्थितीत ही संख्या खूपच कमी आहे. त्यामुळेच नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एसटी महामंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याची दखल घेऊनच महामंडळाच्या वतीने गेल्या वर्षी मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि कोकण या विभागांसाठी 8 हजार चालक आणि वाहकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यापैकी पाच हजार जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उर्वरीत किरकोळ पदांवर काही किरकोळ कारणांमुळे निवड प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे महामंडळाच्या वतीने ही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. महामंडळाने 5 महिन्यांपूर्वी राज्यभरात 3 हजार 54 पदे भरण्याची घोषणा केली. मात्र, ही पदे भरण्याची प्रक्रिया काही कारणास्तव थांबविण्यात आली होती. आता महामंडळाने कोकण वगळता अन्य भागासाठी चालक आणि वाहकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी होणार भरती प्रक्रिया…
जाहिरात निघणार- नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा
भरती होणार- 7 हजार चालक आणि वाहक आणि वर्ग तीनसाठी 700 जागा
भरतीचा विभाग- पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. मुंबई प्रस्तावित
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया- जानेवारी
परीक्षेचा कालावधी- फेब्रुवारी
भरती प्रक्रिया- मार्च

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)