एसटी महामंडळ सवलतीची खैरात कोणासाठी?

File photo

नाना साळुंके

पुणे – आजी-माजी आमदारांना शिवशाही, शिवनेरी यांसारख्या आरामदायी बसेसमध्ये मो अत प्रवासाची घोषणा करून एसटी महामंडळाने एक नवा वाद ओढवून घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर असला, तरी महामंडळाने या आजी-माजी आमदारांचा आशीर्वाद मिळविला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी हा तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सोसावा का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

-Ads-

गेल्याच आठवड्यात एसटी महामंडळाने खैरात केल्याप्रमाणे आजी-माजी आमदारांना मो अत प्रवासाची सवलत दिली आहे. तर, दुसऱ्या बाजूला आतापर्यंत आरक्षित जागेवर किती आमदारांनी प्रवास केला, याचे उत्तर महामंडळाकडे कितपत उपलब्ध आहे, असाही प्रश्‍नच आहे. किरकोळ सन्माननिय अपवाद वगळता आज सर्वच आजी-माजी आमदार आपल्या वैयक्‍तिक आलिशान वाहनांनी प्रवास करतात.

सर्वसामान्य प्रवासी आणि कामगारांच्या समस्यांकडे एसटी महामंडळाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. एसीमध्ये बसलेल्या महामंडळाच्या पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत त्यांचे काम चोखपणे पार पाडले. आमदारांना मिळणारे मानधन आणि माजी आमदारांना मिळणारी पेन्शन पाहता खरेतर त्यांना या सवलतीची मितपत गरज होती, याबद्दल प्रश्‍नचिन्ह आहे. कार्यकर्ते सांभाळणे, मतदारसंघाचा दौरा यासह अन्य कामे त्यांच्याकडे असतात. त्यांच्या याच कार्याची आणि महागाईमुळे वाढत जाणाऱ्या खर्चाची जाणीव ठेऊन महामंडळाने त्यांना एसटीच्या प्रवासात आणि ते सुध्दा आरामदायी तसेच वातानुकुलित बसेसमध्ये प्रवासात सवलत देऊन त्यांच्या “कथित’ गरिबीला एक प्रकारे हातभारच लावला आहे. याउलट आयुष्यभर महामंडळाची सेवा करणाऱ्या कामगारांना लालपरीत प्रवासात सवलत दिली आहे.

त्यातूनच तुम्ही आयुष्यभर लालपरीची साथ सोडायची नाही असा संकेतच महामंडळाने या कामगारांना दिला आहे. ही बाब लक्षात घेऊन उगीचच आजी-माजी आमदारांना दिलेल्या सेवेबाबत कोणीही सर्वसामान्य प्रवासी अथवा कामगारांनी टीका करण्याचे धारिष्ट्य दाखवू नये, अन्यथा दिलेली सेवा काढून घेतल्यास उगीचच पंचाईत होइल. त्यामुळे हे ही नसे थोडके…असे समजून गरीब समजल्या जाणाऱ्या आजी-माजी आमदारांना आणखी मदत मिळेल का? यासाठी या टीकाकारांनी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)