एसटी महामंडळाने निवडला बाह्यवळणाचा पर्याय

रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात ः प्रशासनाचे दुर्लक्ष

बेल्हे- बेल्हे (ता. जुन्नर) गावातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अहमदनगर, कल्याण, सोलापूर, बेल्हे, जेजुरी महामार्ग असे महामार्ग जातात. कल्याण-अहमदनगर महामार्गाला बाह्यवळण रस्ता तयार झाल्याने, अहमदनगर अथवा कल्याणकडे धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस त्यांच्या नियोजित नसलेल्या बाह्यवळण रस्त्यावरून धावत आहेत.
या सर्व घडामोडींना बेल्हे गावातील ग्रामस्थच जबाबदार आहेत. रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी अतिक्रमणांबाबत प्रशासन करीत असलेला कानाडोळा अशा विविध समस्यांमध्ये बेल्ह्यातील सर्वच रस्ते गुदमरून गेले आहेत.गावातील वाहतुकीच्या आणि अतिक्रमणाच्या समस्येमुळे एसटी महामंडळाच्या शेकडो बस गावाऐवजी बाह्यवळण मार्गाने धावू लागल्या असल्याने बेल्हे बसस्थानक प्रवाशांविना ओस पडले आहे. अर्थातचत्याचा दुष्परिणाम बेल्हे गावातील व्यवसाय आर्थिक अडचणीत आले आहेत.
मध्यंतरीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेल्हे गावातील रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविली होती. गावातील बसस्थानक व रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले होते. त्यामुळे गावात एसटी बस येऊन थांबू लागल्या होत्या, प्रवाशामुळे बसस्थानक परिसरातील सर्वच व्यवसायांना आर्थिक ऊर्जितावस्था निर्माण झाली होती; पण बेल्हे बसस्थानक परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्य रस्त्यावरच व्यवसाय सुरू केले. या परिसरात कोणत्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था नसल्याने, वाहने रस्त्यावर उभी राहू लागली. पर्यायाने रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बस बाह्यवळण महामार्गावरून आळेफाटा येथे विश्रांती घेऊ लागल्या. बेल्हे बसस्थानक येथे थांबणाऱ्या बसमधील प्रवासी बेल्ह्यात न उतरता, आळेफाटा येथे उतरू लागले. अर्थातच बेल्हे येथील आर्थिक उलाढाल कमी झाली आहे.

  • मानसिकता बदलण्याची गरज
    बेल्हे गावातील बाजारपेठेतील आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामस्थांनी मुळात मानसिकता बदलणे गरजेचे आहे. गावातील रस्ते मोकळे करून बाहेरून गावात येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला अडथळा निर्माण होणार नाही, बेशिस्त पार्किंग मुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तर येत्या काही दिवसांत गावातील आर्थिक उलाढाल सुधारणा होईल, अन्यथा गावातील रहिवाशांना स्थलांतर करणे,हाच एकमेव पर्याय राहील,अशा जाणकार ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत.
  • बेल्हे बसस्थानकासमोर असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण असल्याने एसटी महामंडळाच्या बसमत व निलंगा आगराच्या बस स्थानक आवारात न येता गावाबाहेर असलेल्या बाह्यमार्गावरून पुढे जातात.
    – आर. के. काळे, वाहतूक नियंत्रक, बेल्हे

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)