एसटी महामंडळाची “सुरक्षितता’ मोहीम

अपघात विरहीत सेवा देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील
 
पुणे – रस्ते अपघातांत इतर वाहनांच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळेच राज्यभरातील लाखो प्रवासी सुरक्षित प्रवासासाठी एसटीला प्राधान्य देत आले आहेत. परिणामी अपघात विरहीत सेवा देण्यासाठी एसटी प्रयत्नशील असून यापुढील काळात यात आणखी सुधारणा करण्यासाठी महामंडळाकडून “विना-अपघात सुरक्षितता’ मोहीम हाती घेतली आहे.

दि. 11 ते 25 जानेवारीदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण देशात सुरक्षितता पंधरवडा साजरा केला जाणार आहे. यात एसटी महामंडळ कृतीशिल सहभाग घेणार आहे. शुक्रवारी (दि.11) रोजी स्वारगेट येथील आगारात विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) मच्छिंद्र पंडीत, आगार व्यवस्थापक एस. एस. शिंदे, पी. एल. कांबळे, स्वारगेट आगाराचे बसस्थानक प्रमुख सुनील हिवाळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एसटी महामंडळ भरती प्रक्रियेपासूनच चालकांच्या समुपदेशनामध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जागरूक व संवेदनशील आहे. परिणामी एसटी अपघातांचा दर लाख कि.मी.ला 0.15 टक्‍के इतका कमी आहे. चालकांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, वैद्यकिय तपासणी, समुपदेशन आशा विविध मार्गाने अपघात विरहीत सेवा देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील असून सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख बक्षीसे, प्रमाणपत्रे, सुरक्षित सेवेचे बिल्ले देऊन सन्मानित करण्यात येते. दरम्यान, “एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ हे ब्रीद घेऊन पुढील पंधरा दिवस पुणे विभागातील सर्व आगारांमध्ये “विना-अपघात सुरक्षितता’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी यावेळी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)