एसटी भाडेवाढ लांबणीवर…

पुणे – गेल्या वर्षभरापासून डिझेलच्या किंमतीत होणारी वाढ लक्षात घेता एसटीची भाडेवाढ होणाची चर्चा होती. मात्र, हा निर्णय तात्पुरता पुढे ढकलण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे ऐन सुटीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

सुट्टीच्या मोसमात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. अशातच या कालावधीत भाडेवाढ होणार अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरु होती. मात्र, हा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी हा दिलासा तात्पूरता ठरणार आहे. कारण येत्या जून व जुलैमध्ये भाडेवाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात दरवाढीचा निर्णय होणार हे निश्‍चीत आहे.

गेल्या वर्षभरात डिझेल सुमारे आठ ते दहा रुपयांनी महागले आहे. डिझेल खर्चावर 33 टक्के, कामगारांच्या वेतनावर 44 टक्के, प्रवासी करावर 12 टक्के, भांडवली खर्च अशा प्रकारे एसटी महामंडळाला खर्च करावा लागत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. एसटीने मागील तिकीट भाडेवाढ 31 जुलै व 22 ऑगस्ट 2014 रोजी दोन टप्प्यात एकत्रितरित्या 14 टक्के एवढी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)