एसटी बसच्या दोषपत्रिका बेवारस स्थितीत

अकलूज आगाराचा गलथान कारभार समोर

रेडा- अकलूज (ता. माळशिरस) आगाराच्या एस. टी. बसची सद्यस्थिती सांगणारी दोषारोपपत्रे चक्‍क इंदापूर तालुक्‍यातील वडापुरी येथील रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यातून अकलूज बसस्थानकाचा गलथान कारभार समोर आला आहे.
एसटी बस मधील चालकाने संबंधित बसची सद्यस्थिती व बसची अवस्था ही त्या दोषीपत्रात नोंद करावयाची असते. त्यानंतर नोंदी व माहितीवरुन त्या बसची दुरुस्ती केली जाते व होणारा बिघाड काढून अपघात टाळले जातात; परंतु अशी महत्वपूर्ण दोषारोपपत्रे फेकून दिल्याने संबंधितांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
वाहनांतील दोषांबाबत चालकाचे प्रतिवृत्त व कार्यशाळेतील नोंद तसेच मार्गावर बिघडलेल्या वाहनासंबधी प्रतिवृत्त, यांत्रिकाने भरावयाची माहिती, वाहतूक नियंत्रकाचा दाखला आदीचा तपशील असणारी कागदपत्रे फेकून दिले जात आहेत. मात्र, यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्‍यांना याचा त्रास होणार आहे. कारण बसची अवस्था त्यामध्ये इंजिन, टायर व बसमध्ये काही बिघाड आहे का? याची माहिती नसल्यामुळे अपघात वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

  • झालेला प्रकार फार गंभीर असून याचा तपास केला जाईल. तसेच संबंधित बसचालक व वाहकावर कडक कारवाई करण्यात येईल.
    तानाजी पवार, आगारप्रमुख अकलूज
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)