एसटी चालक हल्ल्यातील आरोपींना अटक करा

पाथर्डी – पाथर्डी आगारातील एसटी चालक रोहिदास पालवे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी जय भगवान महासंघ व ओबीसी फाउंडेशन इंडिया, पाथर्डी तालुका यांच्या वतीने पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, तहसीलदार नामदेव पाटील व आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी आगारातील एसटी कर्मचारी रोहिदास पालवे यांच्यावर जोहारवाडी परिसरात रविवार, दि. 24 जून रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर हल्ल्याचा जय भगवान महासंघ व ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. या वेळी निवेदन देताना जय भगवान महासंघाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब वाघ, उपाध्यक्ष राहुल फुंदे, ओबीसी फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सुभाष खेडकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, नगरपालिका अध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अविनाश वाघ, अजित कंठाळे, सचिन फुंदे, मल्हारी घुले, अजिनाथ केदार, रमेश घुले, मयूर फुंदे, सचिन फुंदे, गणेश वाघ, रामदास सानप, नवनाथ फुंदे, कमलेश वाघ, अतुल दौंड, रामदास फुंदे, दीपक पालवे, आदिनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर घुले आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)