एसटी चालकास हॉकी स्टीकने मारहाण

फाट्यावर घटना : दोघांवर गुन्हा

शिक्रापूर- पुणे नगर रस्त्यावर एसटीचालक, वाहकांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण करण्याचे प्रकार सध्या वाढत चालले आहे. पुणे- नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमानजीक वाडागाव फाट्यावर रात्री एसटी चालकास हॉकी स्टीकने मारहाण करीत एसटीचे नुकसान केले.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती व फिर्यादीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील तारकपूर एसटी स्थानकातील चालक महेंद्र सोनवणे व वाहक सचिन हजारे हे दि. 25 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एसटी घेऊन अहमदनगरकडून पुण्याकडे जात होते. कोरेगाव भीमानजीक वाडागाव फाट्यावर एक ट्रक रस्ता ओलांडत होता. त्याचदरम्यान पुणे बाजूकडून नगर बाजूकडून कार (एमएच 12- जे यू 11) आली. त्या कारमधून दोन युवक उतरले. त्या युवकांच्या हातात हॉकी स्टीक आणि लोखंडी गज होते. त्यांचा ट्रक चालकासोबत वाद सुरु होता. त्यावेळी रस्ता बंद झाल्याने एसटी चालक महेंद्र सोनवणे यांनी ट्रक चालकास ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी हातामध्ये लोखंडी गज व हॉकी असलेले दोन्ही युवक एसटी चालकाकडे धावत आले. त्यांनी चालक सोनावणे यास तुला काय करायचे आमचे आम्ही पाहू असे म्हणून एसटीची काच फोडून चालकास शिवीगाळ, दमदाटी करत हॉकीने मारहाण करण्यास सुरवात केली. पुन्हा एसटीमध्ये असलेली टामी घेऊन कारमधून निघून गेले. याबाबत एसटी चालक मेहेंद्र भास्कर सोनवणे (रा. पांगरी ता. शिरूर, कासार जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक व अन्य एकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)