एसटी चालकाला शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

पुणे – इतक्‍यात एसटी पुढे जाणार नाही, असे म्हटल्याने चालकाला शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्या तिघांना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
कुणाल बापूसाहेब धालगडे (वय 19, रा. अप्पर इंदिरानगर), अरूण गणपत जाधव (वय 19, रा. खानापूर, ता. हवेली) आणि भाई ऊर्फ अवि लक्ष्मण चांदणे (रा. नागपूर चाळ, येरवडा) अशी पोलीस कोठडी झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत चालक अजय अण्णासाहेब जाधव (वय 33, रा. डोंगरसोनी, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 च्या सुमारास शिवाजीनगर येथील एसटी स्टॅन्डच्या आवारात घडली. फिर्यादी यांनी एसटी स्टॅन्डमध्ये आली होती. ती बस पुढे न्यायची की, आणखी काय आदेश आहे, त्याबाबत चौकशी करण्यासाठी कंट्रोल रूममध्ये जाणार होती. त्यासाठी बस पार्क करत असताना धालगुडे आणि जाधव गाडीत बसले. इतक्‍यात गाडी पुढे जाणार नाही, तुम्ही खाली उतरा, असे फिर्यादींनी दोघांना सांगितले. पुढे न्यायची नाही, तर बस इथे का आणली, म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर तिघांनी बस सोडण्याच्या कारणांनी फिर्यादींना हाताने मारहाण कर सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)