एसटी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाला ‘अपडेशन’ अडथळे

आधार-पॅनकार्ड “लिंक’साठी आठ दिवसांची “डेडलाइन’

पुणे – एसटी महामंडळाच्या बहुतांशी आगारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आधार आणि पॅनकार्ड अद्यापही लिंक करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांचे निवृत्ती वेतन देताना लेखा विभागाला मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. या प्रकाराची पेन्शन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार ही कागदपत्रे येत्या आठ दिवसांत जमा करा, अन्यथा या महिन्याचे निवृत्ती वेतन देण्यात येणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशभरातील सर्व व्यवहार ऑनलाईन होत असतानाच एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी यामध्ये अद्याप पिछाडीवर असल्याची बाब उघडकीस आली आहे; विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या या हलगर्जीपणाला महामंडळही तितकेच कारणीभूत असल्याचेही निदर्शनास आले आहे. एसटी महामंडळाचे अडीचशे आगार आहेत. या आगारात आणि कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत एक लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच राज्यभरात किमान 60 ते 70 हजार सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी आहेत. त्याशिवाय सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वर्षाकाठी एक ते दीड हजाराच्या आसपास आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची आधारकार्ड आणि पॅनकार्ड एकमेकांना “लिंक’ आणि “केवायसी’ केले पाहिजे, असे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबतचे परिपत्रक महामंडळाच्या मुख्य कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आले आहे. त्याशिवाय संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तशी स्मरणपत्रेही पाठविण्यात आली आहेत. मात्र, बहुतांशी कर्मचाऱ्यांनी त्यासंदर्भात अद्यापही पूर्तता केलेली नाही.

त्यामुळे या कर्मचाऱ्यांची पेन्शन देताना पेन्शन विभागाला अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब प्रशासनाच्या वतीने अधिक गंभीरतेने घेण्यात आली आहे. ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अद्याप याची पूर्तता केलेली नाही अशा कर्मचाऱ्यांना थेट घरी स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत, त्यानुसार त्यांना आठ दिवसांमध्ये याची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे. ही पूर्तता न केल्यास या महिन्याची पेन्शन देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)