एसटी महामंडळाला सोशल मीडियाचे वावडे

हेल्पलाइन सुस्थितीत नाही : तक्रार करायची तरी कोठे?


डिजिटल जमान्यात एसटी महामंडळ पिछाडीवर

पुणे – प्रवासासाठी राज्यात सर्वाधिक पसंती असलेल्या एसटी महामंडळाला सोशल मीडियाचे वावडे असल्याचे दिसून येत आहे. आहे ती हेल्पलाइन सुस्थितीत नाही. यातच ट्‌वीटरवरही एसटीचे अधिकृत खाते सुरू नसल्याने नागरिकांनी तक्रार करायची तरी कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य परिवहन (एसटी) नावाने ट्‌वीटरवर दोन अकाउंट आहेत. मात्र, ही दोन्ही खाते अधिकृत नसून ते अॅक्‍टिव्ह नाहीत. यामुळे एखाद्या प्रवाशाला अडचणींविषयी काही माहिती द्यायची असल्यास, ते शक्‍य होत नाही. यामुळे डिजिटल जमान्यात एसटी महामंडळ मागे पडत असल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन वर्षांपूर्वी एसटीने टोल फ्री नंबर सुरू केला. त्यावर सध्या शेकडो प्रवासी तक्रारी नोंदवत आहेत. मात्र, सोशल मीडियाच्या बाबतीत एसटी सपशेल नापास ठरल्याचे दिसते. एसटीचे संकेतस्थळ, अॅप वेळोवेळी बंद पडते. राज्यभरातून तब्बल 18 हजार एसटी बसेसमधून 70 लाख प्रवासी विविध ठिकाणी प्रवास करतात. दररोज कोट्यवधींची उलाढाल असलेल्या एसटी महामंडळाने खाते सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

आज विमान, रेल्वेसेवा जलदगतीने पुढे जात असून प्रत्येक अपडेट ट्‌वीटरवर दिले जाते. मात्र, राज्यात सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेल्या एसटी महामंडळाला हे शक्‍य होत नाही. परिणामी, प्रवाशांना येणाऱ्या अडचणींविषयी ट्‌वीट करायचे असल्यास ते शक्‍य होत नाही. एसटीने नागरिकांची जनभावना लक्षात घेऊन स्वतःचे अधिकृत खाते सुरू करावे.
– नीलेश ढेकळे, विद्यार्थी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)