एसटीला डिझेलवर करमाफी द्यावी : परिवहनमंत्री

मुंबई एसटीला डिझेलवर करमाफी द्यावी, अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्याचा परिणाम इतर गोष्टींप्रमाणेच एसटी महामंडळावरही होत आहे.

इंधनाच्या वाढत्या दराचा परिणाम म्हणून एसटी महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत आला आहे. महामंडळाला या अडचणीतून सोडवण्यासाठी महामंडळाच्या बसेसना पुरवण्यात येणाऱ्या डिझेलवरील राज्य सरकारचे विविध कर माफ करण्यात यावेत, अशी मागणी दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परिवहन मंत्री रावते यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “सध्या दिवसेंदिवस होत असलेल्या भरमसाठ इंधन दरवाढीचा विपरित परिणाम एसटी महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर होत आहे. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर वार्षिक अंदाजे 400 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.”

तसेच, “एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसह होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत सापडला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या बसेसला लागणाऱ्या डिझेलवरील राज्य सरकारची करमाफी करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी”, अशी विनंतीही रावतेंनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)