एसटीमध्ये समावेशासाठी खंडाळा तालुक्‍यातील धनगर समाजबांधव आक्रमक 

संग्रहित छायाचित्र

दि. ऑगस्टला बेमुदत साखळी उपोषण व मोर्चाचे आयोजन 
लोणंद – मराठा आरक्षण बाबत महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाचा भडका सुरु असताना हक्काचे एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज बांधवांनी आंदोलनाचेहत्यार उगारले आहे.

खंडाळा तालुक्‍यातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन दिनांक 3 ऑगस्ट रोजी लोणंद येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे पुष्पगुच्छ अर्पण करून जाहीर निषेध मोर्चास सुरुवात करणार आहेत. संपूर्ण तालुक्‍यातून हा मोर्चा तहसीलदार कार्यालय खंडाळा येथे येऊन निषेध नोंदवित बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत. याबाबतचा सर्व उपस्थित धनगर बांधवांनी खंडाळा तहसीलदार विवेक जाधव यांस निवेदन देऊन शासनास इशारा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी तालुक्‍यातून निवेदन देण्यासाठी जि. प. साताराचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटीलखंडाळा पंचायत समिति माजी सभापती रमेश धायगुडे पाटीललोणंद नगरपंचायतचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पक्षप्रतोद नगरसेवक हणमंतराव शेळके पाटीलखंडाळा तालुक्‍यातील नेते अशोक धायगुडेनिंबोडी गावचे सरपंच बाळासाहेब शेळके पाटीलआण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार जनआंदोलन न्यासचे खंडाळा तालुका अध्यक्ष सत्त्वशील शेळके पाटीलभाजपाचे औद्योगिक सेलचे खंडाळा तालुका अध्यक्ष नवनाथ शेळके पाटीलशिवसेनेचे विभाग प्रमुख संदीप शेळके- पाटीलसामाजिक कार्यकर्ते मोहन शेळके -पाटीललोणंद ग्रामपंचायत माजी सदस्य बबनराव शेळके -पाटीलकराडवाडी चे सरपंच कुंडलिक ठोंबरेमोर्वेचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वरधायगुडे आदी खंडाळा तालुक्‍यातील सर्व पक्षीय धनगर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)