एसटीत महिलेच गंठण चोरीस

उंब्रज – बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील गंठणवर चोरट्याने डल्ला मारला. याबाबत माहिती अशी, सुजाता अधिकाराव चरेगावकर उन्हाळी सुट्टीसाठी चरेगाव येथे दोन मुलांसह आल्या होत्या. दि. 24 रोजी एक मुलगा आजारी असल्याने त्या कराड येथे घेवून आल्या होत्या. परत जाताना कागल ते सातारा बसमधून प्रवास करताना बस कोल्हापूर नाक्‍यावर आल्यानंतर त्यांनी तिकिट काढण्यासाठी पर्समधील पैसे काढले. प्रवासादरम्यान चोरट्याने पर्समधील 2 तोळे 610 ग्रॅमचे 40 हजारांचे गंठन चोरट्याने लंपास केले. उंब्रजमध्ये उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून हवालदार रवींद्र पवार करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)