एसटीच्या वाहकाने चोरले तिकीट मशीन

पुणे- एसटीच्या एका वाहकाने दुसऱ्या वाहकाचे इलेक्‍ट्रॉनिक तिकीट इश्‍यु मशीन चोरले. यानंतर या मशिनव्दारे विनावाहक विनाथांबा निमआराम बसचे बुकींग करून 7 हजार 620 रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बी. एस. नागरगोजे असे आरोपी वाहकाचे नाव आहे. तो शिवाजीनगर बस आगारात काम करतो. त्याने शिंदे नावाच्या वाहकाने चार्जिंगला ठेवलेले तिकीट मशीन चोरले होते. यानंतर या मशीनने 27 तिकीटे बुक करून त्याचे पैसे स्वत:च्या खिशात घातले. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डी. एस. शिंदे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)