एसटीच्या धडकेत सायकलस्वार ठार

लोणंद, दि. 3 (प्रतिनिधी) – काळज (ता. फलटण) गावच्या हद्दीत लोणंद-फलटण रस्त्यावर एशियाड बसने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तानाजी महिपती मोरे (वय 50, रा. साखरवाडी) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. हा अपघात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
साखरवाडी येथील तानाजी महिपत मोरे हे रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान, लोणंद-फलटण रस्त्याने सायकलवरुन निघाले होते. ते काळज गावच्या हद्दीत असलेल्या आयोध्या ढाब्याजवळ आले असता लोणंदकडून फलटणच्या दिशेने निघालेल्या एशियाड या बसने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. दरम्यान, एसटीचालक सच्चीतादंन शेलार हे बेदरकारपणे एसटी चालवत असल्यामुळेच अपघात घडला असून एसटीच्या या भीषण धडकेत मोरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातप्रकरणी मुगुटराव घाडगे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभार करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
3 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)